ज्यांनी बँका काढल्या नाहीत, त्यांनी शिकवू नये- अजितदादा

काल नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ज्यांनी आयुष्यात एकही सहकारी संस्था काढली नाही की चालवली नाही.

Updated: Jan 19, 2013, 05:16 PM IST

www.24taas.com, पुणे
काल नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ज्यांनी आयुष्यात एकही सहकारी संस्था काढली नाही की चालवली नाही. त्यांनी आम्हाला शिकवू नये. त्यांनी माझ्या संस्था येऊन बघाव्यात, आपण काय दिवा लावला आहे त्याचं आत्मपरीक्षण त्यानी करावं. असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
`संस्था न काढणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये` असं म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. तर काल राज ठाकरेंनी अजितदादांना टार्गेट केले होते. `नाशिकमधे राज ठाकरे यानी राष्ट्रवादीवर केलेल्या टिकेला अजित पवार यांनी उत्तर दिलं. ज्यानी कधी आयुष्यात बँका काढल्या नाहीत, साधी दूधसंस्था काढली नाही`, `त्यांनी डबघाईची भाषा करू नये, त्यांच्याकडेही साडेचार वर्षे सत्ता होती.

पण स्वत: काही करायचे नाही आणि दुसऱ्यांवर टीका करायची..` `त्यांनी माझ्या संस्था येऊन बघाव्या कशा चालतात ते. आपण काय दिवा लावला आहे त्याचे आत्मपरीक्षण त्यानी करावे.` राज ठाकरेंचा अजित पवार यांनी खरपूस समाचार घेतला.