अजितचंद, छगनचंद नावाने बॅंक बुडली असती- राज

नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फटकेबाजी केली. आहे एका कार्यक्रमात राज ठाकरे आणि नितीन गडकरी एकत्र आले होते.

Updated: Jan 18, 2013, 09:36 PM IST

www.24taas.com, नाशिक
नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फटकेबाजी केली. आहे एका कार्यक्रमात राज ठाकरे आणि नितीन गडकरी एकत्र आले होते. यावेळी राज यांनी अजित पवार आणि छगन भुजबळ यांना जोरदार टोला लगावला. या बँकेचं नाव `अजितचंद, छगनचंद नावाने बॅंक असती तर बुडली असती. `
असं म्हणत राज ठाकरेंनी अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडलं. नाशिकमध्ये एका बँकेच्या कार्यक्रमानिमित्त राज ठाकरे आणि नितीन गडकरी हे एकत्र आले होते. त्याच कार्यक्रमात राज ठाकरे म्हणाले की नाशिकमध्ये मनसे आणि भाजपची युती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज आणि गडकरी यांच्यातील संबंध आणखी दृढ झाल्याचे दिसून आले. भुजबळ, अजितदादांना मात्र राज ठाकरेंनी टोला हाणला आहे.

`अजितचंद, छगनचंद नावाने बॅंक असती तर बुडली असती`, हुकुमचंद नावाने आहे म्हणून चांगली सुरू आहे असं म्हणत त्यांनी हलकेच अजितदादांना चिमटा काढला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज आणि गडकरी एकाच मंचावर पुन्हा एकदा दिसून आले.