पहा राज ठाकरेंनी कोणाला केलं एवढं भावूक...

९ आणि १० मार्चला आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या कर्णबधिरांसाठी मोफत कान तपासणी शिबिराच आयोजन करण्यात आलं होत.

Updated: Apr 5, 2013, 07:53 PM IST

www.24taas.com, नाशिक
नाशिक जिल्ह्यातील सुमारे बाराशे कर्णबधिरांना मनसेच्या वतीनं मोफत श्रवणयंत्र देण्यात आली. स्टार की फाउंडेशनचे बिल ऑस्टिन, मनसे अध्क्ष राज ठाकरे तसचं शर्मिला ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
मनसेच्या सातव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ९ आणि १० मार्चला आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या कर्णबधिरांसाठी मोफत कान तपासणी शिबिराच आयोजन करण्यात आलं होत. त्यावेळी रुग्णाच्या कानाच माप घेऊन त्याची नावनोंदणी करण्यात आली होती.

रुग्णांना ही श्रवणयंत्र देण्यात आली.पहिल्यांदाच आवाज ऐकू आल्याने उपस्थितांच्या चेहऱ्यावर हासू आणि डोळ्यात आनंदआश्रू असे भाव दिसून येत होते. आणि त्यातही राज ठाकरेंची उपस्थिती याने रूग्णांची अवस्था फारच वेगळी झाली होती.. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.