www.24taas.com, मुंबई
‘पोलिसांचं खच्चीकरण खपवून घेतलं जाणार नाही. पोलिसांचं मनोधैर्य खच्चीकरण करतात... हे महाराष्ट्रात चालणार नाही. कुणीही येतं आणि पोलिसांवर हल्ले करतं... आम्ही कधीच पोलिसांवर हात टाकणार नाही.’ असं खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलिसांवर सीएसटी येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्च्याच्या वेळेस म्हटंले होते. आज विधीमंडळ परिसरातच पोलीस निरिक्षक सचिन सूर्यवंशी यांना आमदारांनी केलेल्या माराहाणीवर राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पोलीस निरिक्षक सचिन सूर्यवंशी यांना झालेल्या मारहाणीमध्ये मनसे आमदार राम कदम ह्यांच्यावर देखील आरोप ठेवण्यात आली आहे. मनसे आमदार राम कदम यांच्यावर आरोप झाल्याने राज ठाकरे यांनी पोलीसांवर हात उचलू नका या गोष्टीचा मात्र विसर पडला असावा असेच दिसून येते.
आमदारांच्या कृतीने राज ठाकरेही संतप्त झाले आहेत. पोलिसांवर कुठेही हात उचलणं गैरच आहे. मनसे आमदारानं असं कृत्य केलं असेल, तर त्याच्यावरही कारवाई व्हायला हवी असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं.