गडकरींवर आरोप करणार, केजरीवाल यांचा एल्गार

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा यांच्यावर अरविंद केजरीवाल यांनी आरोपांच्या फैरी झाडल्यानंतर आज सायंकाळी पाच वाजता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याबाबत गंभीर गौप्यस्फोट करणार आहेत.

Updated: Oct 17, 2012, 05:18 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा यांच्यावर अरविंद केजरीवाल यांनी आरोपांच्या फैरी झाडल्यानंतर आज सायंकाळी पाच वाजता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याबाबत गंभीर गौप्यस्फोट करणार आहेत.
अरविंद केजरीवाल हे `एआयसी`च्या सदस्या अंजली दमानिया यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन नितीन गडकरी यांचा भांडाफोड करणार आहेत.
केजरीवाल यांनी कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्यावर गंभीर आरोप करीत राजीनामा देण्यासाठी दिल्लीत आंदोलन केले होते. त्यानंतर केजरीवाल यांनी आता भाजप म्हणजेच गडकरी यांच्याकडे मोर्चा वळविणार आहेत.