७०० भारतीयांचे ६ हजार कोटी परदेशी बँकांमध्ये
सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्याची मालिका सुरू असून आज त्यांनी भारताचा स्वीस बँकेतील काळ्या पैशाचा काही लेखाजोखा मांडला यात त्यांनी मुकेश अंबानी, अनिल अंबांनी, काँग्रेसला टार्गेट केले आहे.
केजरीवालांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ, मारहाण
इंडिया अगेन्स्ट करप्शनचे प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेत प्रचंड गोधंळ घालण्याचा प्रयत्न केला गेला.
काँग्रेस 'रिलायन्स'चे दलाल?- केजरीवाल
काँग्रेस हे मुकेश अंबानींचे दुकान झाले आहे. मुकेश अंबानींच्या इशाऱ्यावर देशातील सरकार चालत आहे. सरकारने रिलयान्सला १ लाख कोटींचा फायदा करून दिला आहे. गॅस दरवाढीसाठी गॅस उत्पादन निम्म्यावर आणलं गेलं आहे आदी गंभीर आरोप अरविंद केजरीवाल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
काँग्रेस-भाजप अंबानींचं दुकान - केजरीवाल
काँग्रेस - भाजप हे दोन्ही मुकेश अंबानींची दुकानं आहेत, असा गौप्यस्फोट टीम अरविंद केजरीवाल यांनी आज केला आहे. देशातील सरकार हे काँग्रेस किंवा भाजप चालवत नसून अंबानी चालवत असल्याचीही घणाघाती आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
अजितदादांनी केली सुप्रियाताईंना घोटाळ्यात मदत
पुण्याजवळ असलेल्या लवासा लेक सिटीची जमीन लिलाव न करता सुप्रिया सुळे यांच्या कंपनीला कवडीमोल भावाने दिल्याचा आरोप माजी आयपीएस आधिकारी वाय. पी. सिंग यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला आहे.
पवार काका-पुतण्यांच्या पाठीशी राणे- Y.P. सिंग
लवासा घोटाळ्याबाबत केजरीवाल यांना टार्गेट करीत वाय. पी. सिंग यांनी पवार यांच्यावर घणाघाती आरोप केले. त्याचसोबत त्यांनी उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावरही आरोप केले.
पवार काका-पुतण्यांना केजरीवाल सामील- Y.P.
मुंबई : माजी आयपीएस अधिकारी वाय. पी. सिंग यांची पत्रकार परिषद | ३४८ एकर जमीन सुप्रिया सुळेंना विकली गेली
सिंचन घोटाळ्यात भाजप-काँग्रेसचं साटंलोटं
अरविंद केजरीवाल यांनी आज आणखी एक नवा गौप्यस्फोट केलाय..वडेरा आणि खुर्शिदनंतर त्यांनी आज भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर हल्लाबोल केलाय.
चिल्लर आरोपांना महत्व देत नाही- गडकरी
अरविंद केजरीवाल यांनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरींवर केलेल्या गंभीर आरोपांना नितीन गडकरी यांनी ताबडतोब प्रत्युत्तर दिलं आहे. आपण अशा चिल्लर आरोपांना महत्व देत नाही असं सांगत नितीन गडकरी यांनी आपल्यावरील आरोप झटकायचा प्रयत्न केला आहे.
गडकरी चोर, पाणी आणि जमीनही चोरली- केजरीवाल
शेतकऱ्यांचं पाणी चोरलं, जमीन चोरली... त्यामुळेच शेतकऱ्यांवर आत्महत्येची आली वेळ- केजरीवाल
गडकरींवर आरोप करणार, केजरीवाल यांचा एल्गार
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा यांच्यावर अरविंद केजरीवाल यांनी आरोपांच्या फैरी झाडल्यानंतर आज सायंकाळी पाच वाजता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याबाबत गंभीर गौप्यस्फोट करणार आहेत.
डीएलएफ आणि हरियाणा सरकारचं साटंलोटं- केजरीवाल
`इंडिया अगेन्स्ट करप्शन`चे अरविंद केजरीवाल यांनी रॉबर्ट वडेरा, डीएलएफ आणि हरियाणा सरकारच्या संबंधांबाबत आणखी एक नवा गौप्यस्फोट केलाय. डीएलएफच्या सेझमध्ये रॉबर्ट वडेरा यांचे 50 टक्के शेअर्स असल्याचा दावा केजरीवालांनी केलाय.
`वडेरा-डीएलएफ` चौकशी होणार नाही - चिदंबरम
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा आणि रिअल्टी क्षेत्रातील प्रमुख कंपनी डीएलएफ यांच्यातील आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार नसल्याचं अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केलंय.
सोनियांच्या जावयाने केले फेसबुक अकाऊंट बंद
रिअलिटी क्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या डीएलएलची कृपादृष्टी झाल्याच्या आरोपांवरून वादात अडकलेले काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा यांनी आपले फेसबुक अकाउंट बंद केले आहे. फेसबुकवर त्यांनी भारताची तुलना बनाना रिपब्लिकशी केली होती.
सरकारकडे नाही कोर्टात जा - पवारांचा सल्ला
सोनिया गांधीचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी बेकायदा संपत्ती गोळा केल्याचे काही पुरावे असतील तर अरविंद केजरीवाल कोर्टात जाऊ शकतात, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलाय.
फुकटातल्या प्रसिद्धीसाठी माझ्यावर आरोप - वढेरा
रॉबर्ट वढेरा यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावलेत. फुकटातल्या प्रसिद्धीच्या मागे धावणाऱ्या लोकांनी आपल्यावर हे बिनबुडाचे आरोप केल्याचं त्यांनी म्हटलंय.
...तर केजरीवालांवर दावा ठोका- अण्णा हजारे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रॉबर्ट वडेरांच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. केजरीवल यांचे आरोप खोटे असतील तर त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोका असंही अण्णांनी म्हटलंय.
केजरीवाल यांचे गांधींच्या जावयावर गंभीर आरोप
अरविंद केजरीवाल यांनी आयोजित केलेल्या आजच्या पत्रकार परिषदेत सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. DLF आणि वढेरांमध्ये साटंलोटं असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.