सचिन बोलला 'कुठं ना कुठं क्रिकेट खेळतच राहणार'

भारतरत्न सचिन तेंडुलकरनं आज निवृत्त झाल्यावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं सचिन मोकळेपणानं उत्तर दिलं. या पत्रकार परिषदेतल्या भारतीय पत्रकारांसोबतच जगातले पत्रकार उपस्थित होते. यावेळी बोलतांना काही दिवस आपण आराम करणार असून आपण आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या प्रकारे क्रिकेट खेळतच राहणार असल्याचं म्हटलं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 18, 2013, 09:24 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतरत्न सचिन तेंडुलकरनं आज निवृत्त झाल्यावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं सचिन मोकळेपणानं उत्तर दिलं. या पत्रकार परिषदेतल्या भारतीय पत्रकारांसोबतच जगातले पत्रकार उपस्थित होते. यावेळी बोलतांना काही दिवस आपण आराम करणार असून आपण आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या प्रकारे क्रिकेट खेळतच राहणार असल्याचं म्हटलं.
आपला मोठा भाऊ अजित तेंडुलकर आणि आचरेकर सरांसोबत आपल्या नात्याबद्दलही सचिननं सांगितलं. तसंच देशाकडून झालेला हा सन्मान म्हणजे भारतरत्न पुरस्कार देशातल्या प्रत्येक आईला समर्पित असून मी सर्व क्रीडापटूंच्यावतीनं स्वीकारतो, असंही सचिन म्हणाला.

पाहा व्हिडिओ

अजून सचिन काय म्हणाला... वाचा...
मुंबई- निवृत्तीनंतर पहिल्यांदाच सचिनची पत्रकार परिषद
क्रिकेट माझं ऑक्सीजन आहे...
अजूनही वाटत नाही, मी रिटायर्ड झालो
अजून मला वाटत नाहीय, की मी पुन्हा क्रिकेट खेळणार नाही...
२४ वर्षातील करिअरमध्ये आलेल्या चॅलेंजेसमध्ये कुटुंबाचा आधार
४० पैकी ३० वर्ष क्रिकेटच खेळलो
भारतरत्न देशातल्या प्रत्येक आईसाठी समर्पित
जरी मी शरीरानं क्रिकेट खेळणार नसलो, तरी मनानं कायम टीम इंडियासोबत असेल
आईसाठी मुंबईत ठेवली होती माझी अखेरची मॅच
मी बीसीसीआयला विनंती केली होती की मॅच मुंबईत घ्या
क्रिकेट एंजॉय करत होतो, मात्र जोपर्यंत मला फिलिंग येणार नव्हतं तोपर्यंत मी क्रिकेट सोडणार नव्हतो...
माझ्या शरीरानं मला सांगितलं आता तू थांब, त्यामुळं मी थांबलो...
२२ यार्डानं सर्व काही दिलं
सर्व तरुण खेळाडूंसोबत चांगली चर्चा
प्राध्यापक सी.एन.आर रावचं सचिननं केलं अभिनंदन
वेस्ट इंडिजचे क्रिकेटर खूप चांगले आहेत
टेनिस येल्बो सर्जरीनंतर खूप निराश झालो होतो, कारण मला साधी प्लास्टिकची बॅटही उचलता येत नव्हती
जखमी झाल्यावर ते ठिक व्हायला खूप वेळ लागतो
सरांनी मला `वेल डन` म्हटलं ते ऐकून मला खूप आनंद झाला
आचरेकर सर आणि अजित आणि मी, ही आमची सॉलिड टीम होती
मी पुन्हा तिथं जावू शकणार नाही, या विचारानं झालो इमोशनल
सहकारी खेळाडूंनी जसं सेंडॉफ दिलं, जेव्हा खेळपट्टीवरून परतत होतो, तेव्हा इमोशनल झालो
कुटुंबासोबत नाश्ता केला...
सकाळी सव्वा सहाला उठलो, स्वत:च्या हातानं चहा बनवला..
आजची सकाळ खूप रिलॅक्स्ड होती...
सचिननं सांगितली कशी गेली त्याची आजची सकाळ
पण ज्या पद्धतीनं माझं रिटायर्डमेंट झालं त्यानं अजितही सुखावला असं वाटलं
अजित काल खूप इमोशनल होता, पण तो दाखवत नव्हता
मी देशासोबत अजितलाही रिप्रेझेंट करत होतो
कोच हा कोच असतो, तो कुठून आला हे महत्त्वाचं नाही
टीकाकारांकडे मी जास्त लक्ष दिलं नाही
कोणी टीका केली आणि कोणी स्तुती केली, त्यावर सगळं अवलंबून
मला इतर गोष्टींबाबत बोलण्यासाठी थो़डा वेळ द्या...
२००३ वर्ल्डकप स्पर्धेत हरलो होतो... त्याची खंत
सर्व चाहत्यांसाठी खूप मोठं थॅंक्यू...
वर्ल्डकप जिंकणं खूप महत्त्वाचा दिवस होता
अर्जुन क्रिकेटसाठीच... त्याला त्याची आवड आहे... पण त्याला मोकळं सोडा
अर्जुन तेंडुलकरला सोडून द्या... त्याच्यावर प्रेशर नको
मला पहिल्यांदाच प्रत्यक्षपणे खेळतांना पाहून आई खूप खूश होती
इतर क्रीडापटूंनाही त्यांच्या योगदानानुसार सन्मान व्हावा
देशातल्या प्रत्येक क्रीडापटूच्यावतीनं मी भारतरत्न स्वीकारलाय
संगीत माझं पॅशन आहे...
वेगवेगळ्या मूडमध्ये मी ती गाणी ऐकतो...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.