www.24taas.com झी मीडिया, मुंबई
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची शेवटची टेस्ट वानखेडेवरच होणार आहे. वेस्टइंडिजविरुद्ध होणारी दुसरी टेस्ट सचिनच्या करिअरमधील विक्रमी २०० वी टेस्ट तर असणार आहे. शिवाय त्याची ही कारकिर्दीची अखेरची टेस्ट ठरणार आहे.
आता सचिन वानखेडेवर आपल्या घरच्या मैदानावर क्रिकेटला अलविदा करणार आहे. टी-20 आणि वन-डे क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतलेल्या सचिननं कालच आपण टेस्ट क्रिकेटला अलविदा करणार असल्याचं बीसीसीआयमार्फत सांगितलं होतं.
त्याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्री आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी श्रीनिवासन यांची भेट घेतली.
आणि वेस्टइंडिज दौऱ्यातील होणारी दुसरी टेस्ट मुंबईतच खेळवण्यास बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांनीही अनुकूलता दर्शविल्याचे एमसीए अध्यक्ष रवी सावंत यांनी सांगितल आहे.
भारतीय क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याच्या सचिन तेंडुलकरच्या निर्णयावर ‘एका सुवर्ण युगाची अखेर’ अशा शब्दात गुरुवारी प्रतिक्रिया दिली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.