www.24taas.com, मुंबई
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याला साहित्यवर्तुळातून विरोध होऊ लागला आहे. उघडपणे बोलायला मात्र कुणीही तयार नाही. ज्येष्ठ समिक्षिका पुष्पा भावे यांनी मात्र बाळासाहेबांचं नावं द्यायला उघडपणे विरोध केला आहे. व्यासपीठाला बाळासाहेबांचं नाव देण्याचा निर्णय झाला तेव्हा याबाबत कुणीच आक्षेप घेतला नव्हता.... काही वेळापूर्वी आम्ही पुष्पा भावे यांची भूमिका जाणून घेतली...
त्यांच्या मते, `बाळासाहेबांनी साहित्य संमेलनाला बैलबाजार असा शब्द वापरला होता. पर्यायाने साहित्यिकांना बैल म्हटंले होते. त्यानंतर अनेक वेळ पु.ल. देशपांडे यांच्यावरही टीका त्यांनी वेळोवेळी केली होती`. `जेव्हा पु.ल.देशपांडे यांना ज्ञानपीठ मिळालं तेव्हा त्यांनी पु.ल. यांच्यावर त्यांनी कोटी केली होती. `मोडका पुल`अशाप्रकारे त्यांच्यावर त्यांनी टीका केली होती`. त्यांनी साहित्यिकांना आणि साहित्य संमेलनावर नेहमीच टीका केली असे असताना त्यांचे नाव व्यासपीठाला देणं योग्य नाही. त्यामुळे त्यांच्या स्मृती ज्यांना कोणाला जागवायच्या असतील त्यांनी वेगळ्या प्रकारे जागवाव्यात... असे म्हणतं ज्येष्ठ समिक्षिका प्रा. पुष्पा भावे यांनी बाळासाहेबांच्या नावाला थेटपणे विरोध दर्शविला आहे.
बाळासाहेबांनी साहित्यिकांचा उल्लेख `बैल` असा केला होता... महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व असलेल्या पु.ल. देशपांडेंसारख्या ज्येष्ठ साहित्यिकांवरही बाळासाहेबांनी कठोर शब्दांत टीका केली होती. तसंच इतर साहित्यिकांवरही त्यांनी वारंवार टीका केली होती. त्यामुळे साहित्य वर्तुळातून व्यासपीठाला बाळासाहेबांचं नाव देण्याला विरोध होतो आहे.