`हप्ता बंद`ने केलं नेत्रहीन महिलेला कर्जमुक्त

झी मराठीच्या हप्ता बंद कार्यक्रमाने एका नेत्रहीन महिलेचा कर्जाचा बोजा कमी केलाय...या कार्यक्रमानिमित्ताने विजयी ठरलेली नेत्रहीन अंजली जमाले यांच्या संघर्षाची कहाणी...

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 25, 2012, 09:19 AM IST

www.24taas.com, मुंबई
झी मराठीच्या हप्ता बंद कार्यक्रमाने एका नेत्रहीन महिलेचा कर्जाचा बोजा कमी केलाय...या कार्यक्रमानिमित्ताने विजयी ठरलेली नेत्रहीन अंजली जमाले यांच्या संघर्षाची कहाणी...
ही कहाणी आहे अंजली शहाजी जमाले यांची. या नेत्रहीन महिलेचा संघर्ष इतरांना प्रेरणा देणारा आहे. अंजलीचे पती शहाजी हेही नेत्रहीन आहेत. टेलिफोन बूथवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. त्याच काळात त्यांनी घरासाठी लोनही घेतलं होतं. मात्र मोबाईल क्रांतीनंतर टेलिफोन बुथचा व्यवसाय चालेनासा झाला. परिणामी त्यांना टेलिफोन बुथ बंद करावा लागला आणि कर्जही घ्यावं लागलं. मात्र त्यांचा जगण्याचा संघर्ष सुरूच होता. आणि त्यातच त्यांच्या मदतीला धावून आला झी मराठीचा हप्ताबंद कार्यक्रम. हप्ताबंदमध्ये अंजली जमालेंनी 4 लाख 13 हजारांचं बक्षीस जिंकून कर्ज फेडून टाकलं.
गरिबी असली तरी जमाले कुटुंबाच्या सामाजिक जाणिवा जिवंत आहेत. दहा वर्षापूर्वी त्यांनी जिना नावाच्या नेत्रहीन मुलीला दत्तक घेतलं होतं. तिला शिकवून तिचं लग्नही या दांपत्यानं लावून दिलं. नेत्रहीन दांपत्याची ही कृती समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.