गर्भवती महिलेवर विनोद, कपिल शर्मा अडचणीत

कॉमेडीचा किंग कपिल शर्मा आपल्या कथिक विनोदामुळे कायदेशीर अडचणीत सापडला आहे. कॉमेडी नाइट्स विथ कपिल या आपल्या शोमध्ये कपिलने एका गर्भवती महिलेवर खोचक विनोद केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 9, 2014, 02:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कॉमेडीचा किंग कपिल शर्मा आपल्या कथिक विनोदामुळे कायदेशीर अडचणीत सापडला आहे. कॉमेडी नाइट्स विथ कपिल या आपल्या शोमध्ये कपिलने एका गर्भवती महिलेवर खोचक विनोद केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. त्याच्या विरोधात राज्य महिला आयोगात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील एका महिला संघटनेने कपिल विरोधात तक्रार दाखल केली आहे. संघटनेनुसार, गर्भवती महिलेबद्दल वक्तव्य करताना कपिल शर्मा याने सर्व सीमा पार केल्याचा आरोप करण्यात आला. कपिलने अशा शब्दांचा वापर केला की अत्यंत आक्षेपार्ह आहे.
हेमा मालिनी पाहुणी म्हणून आलेल्या एपिसोडमध्ये कपिलने हे वक्तव्य केले आहे. अशा प्रकारचा विनोद स्वीकार्य नसल्याचे सांगून राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
देशातील खड्ड्याचा फायदाही आहे, एखाद्या गरीब व्यक्तीची बायको गर्भवती असेल तिला हॉस्पिटलमध्ये नेतानाच तिची डिलेवर होईल.... बाळ जन्माला आल्यावर लगेच म्हणेल वाव इट्स इंडिया..... असे वक्तव्य कपिल शर्माने केलं होतं.
महिला आयोगही या प्रकरणाची चौकशी करीत आहे. यापूर्वी गुत्थीने शो सोडल्यानंतर कपिल वादात अडकला होता. आता या प्रकरणाने पुन्हा अडचणींना त्याने आमंत्रण दिले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.