सलमान झाला हृतिक रोशनचा सल्लागार?

नुकताच आपल्या पत्नी सुझान खान पासून वेगळा झालेला अभिनेता हृतिक रोशन आपलं १३ वर्षांचं नातं तुटल्यामुळं दु:खी आहे. मात्र या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं यासाठी त्यानं सल्ला घेतलाय तो अभिनेता सलमान खानकडून...

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 9, 2014, 11:24 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नुकताच आपल्या पत्नी सुझान खान पासून वेगळा झालेला अभिनेता हृतिक रोशन आपलं १३ वर्षांचं नातं तुटल्यामुळं दु:खी आहे. मात्र या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं यासाठी त्यानं सल्ला घेतलाय तो अभिनेता सलमान खानकडून...
अभिनेता हृतिक रोशननं नुकतंच फेसबुक पेजवर आपल्या भावना मोकळ्या केल्या आहेत. मात्र या भावना होत्या त्याचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट ‘क्रिश-३’बद्दल... बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया त्यानं जाणून घेतल्या.
पण ते असलं तरी तो आपल्या घटस्फोटामुळं अस्वस्थ असल्याचंही दिसून येतंय. हृतिक आणि सुझान हे लग्नापूर्वी ४ वर्षाआधीपासून रिलेशनशीपमध्ये होते. त्यांच्या अचानक वेगळं होण्यामुळं साहजिकच ते डिस्टर्ब झाले आहेत. त्यामुळंच की काय अभिनेता सलमान खान आता सल्लागाराच्या भूमिकेत येतोय. सुझान-हृतिकची मोडलेली घडी बसवण्यासाठी तो काहीतरी विशेष औषध देतोय? अशी चर्चा आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे ज्या हृतिकच्या ‘गुजारिश’ चित्रपटाबद्दल सलमान इतकं वाईट बोलला होता, तोच हृतिक सलमानला आपली दुखभरी कहानी ऐकवायला आणि त्याचा सल्ला घ्यायला सल्लूमियाँच्या पनवेल इथल्या फार्म हाऊसवर पोहोचला. आता ४८ वर्षीय अविवाहित सलमान हृतिकला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी सल्ला देणार आहे?
असो... काहीही असलं तरी जर सलमान खरंच हृतिक-सुझानला पुन्हा एकत्र आणू शकला, तर ही नक्कीच कौतुकाची आणि आनंदाची बातमी असेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.