राधा ही बावरी.... काय होणार नक्की राधाचं....

`राधा ही बावरी` या मालिकेत आता सौरभसमोर उघड झालंय केदारचं खरं रुप.. केदारनंच मितालीची ही अवस्था केली आहे हे सौरभला समजतं आणि त्याच्यावर दु:खाचा डोंगरंच कोसळला.

Updated: Mar 8, 2013, 03:22 PM IST

www.24taas.com, मुंबई
`राधा ही बावरी` या मालिकेत आता सौरभसमोर उघड झालंय केदारचं खरं रुप.. केदारनंच मितालीची ही अवस्था केली आहे हे सौरभला समजतं आणि त्याच्यावर दु:खाचा डोंगरंच कोसळला. मितालीची विचारपूस करण्यासाठी सौरभ आणि राधा तिच्या घरी येतात.
तेव्हा एकट्या सौरभशीच आपल्याला बोलायचं असल्याचं मिताली सांगते. आणि मग त्या दिवशी घडलेल्य़ा भयंकर घटनेचा पाढाच ती सौरभ समोर वाचते.. मितालीनं केदारचं नाव घेताच सौरभच्या डोक्यातंही चक्र फिरु लागतात. त्यावेळचं केदारचं विचीत्र वागणंही मिताली सौरभच्या कानावर घालते मग मात्र सौरभ मितालीला हे पोलिसांना नं सांगण्याची विनंती करतो.
आता केदारच्या अशा वागण्यामागे नक्की काय कारण आहे हे सत्य जाणून घ्यायचा सौरभ प्रयत्न करणार काय़ हे सत्य तो पोलीस आणि घरच्यांपासून लपवून ठेवण्यात यशस्वी होणार का आणि राधा समोर मात्र आपलं मन मोकळं करणार का हे सारं पाहणं आपल्या सर्वांसाठी खूपच रंजक ठरणार आहे..