भारत-बांग्लादेश पहिली वन-डे मिरपूर स्टेडियमवर रंगणार

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिली वन-डे मिरपूरच्या स्टेडियमवर रंगणार आहे. दुपारी १.३० वाजता वन-डेला सुरुवात होणार आहे. महेंद्रसिंग धोनी आणि मशरफे मोर्तझा परतल्यानं दोन्ही टीम्स फुल स्ट्रेंथनं मैदानात उतरतील. 

PTI | Updated: Jun 18, 2015, 09:36 AM IST
भारत-बांग्लादेश पहिली वन-डे मिरपूर स्टेडियमवर रंगणार  title=

मिरपूर : भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिली वन-डे मिरपूरच्या स्टेडियमवर रंगणार आहे. दुपारी १.३० वाजता वन-डेला सुरुवात होणार आहे. महेंद्रसिंग धोनी आणि मशरफे मोर्तझा परतल्यानं दोन्ही टीम्स फुल स्ट्रेंथनं मैदानात उतरतील. 

१८५ ओव्हर्सचाच फतुल्लाह टेस्टमध्ये पावसामुळए खेळ होऊ शकला. त्यामुशे आता तीन वन-डे मॅचेसची सीरिज तरी पावसाच्या व्यत्ययाशिवाय व्हावी, अशी क्रिकेटरसिकांना अपेक्षा आहे. 

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया बांग्लादेशवर हल्लाबोल करण्यास तयार आहे. मिरपूरची विकेट ही स्लो आहे. मात्र, पाऊस पडल्यानं या विकेटमध्ये काही बदल झालेले पाहायला मिळू शकता. 

२००४, २००७ आणि २०१४मध्ये झालेल्या सीरिजमध्ये भारतानं बाजी मारली आहे. मात्र, नजीकच्या काळआत बांग्लादेशनं पाकिस्तानवर मात करत भारतीय टीमला धोक्याचा इशारा दिलाय. आता टीम इंडिया वन-डे सीरिजमध्ये विजयी सलामी देते का, याकडे लक्ष आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.