कॉमनवेल्थ गेम्सच्या पहिल्या दिवशीच भारताचं मेडल पक्क

कॉमनवेल्थ गेम्सच्या पहिल्या दिवशी भारताचं पहिलं मेडल निश्चित झालंय. ज्यूडोच्या 60 किलो वजनी गटात नवज्योत चानानं फायनलमधील आपला प्रवेश निश्चित केलंय. त्यानं सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ले ग्रॅनेजवर वाझा अरी पद्धतीनं टफ बाऊटमध्ये मात केली. आता फायनलमध्येही बाजी मारून चाना भारताला पहिलं गोल्ड मेडल पटकावून देतो का? ते पाहणं महत्तवाचं ठरणार आहे.

Updated: Jul 24, 2014, 08:11 PM IST
कॉमनवेल्थ गेम्सच्या पहिल्या दिवशीच भारताचं मेडल पक्क title=

मुंबई: कॉमनवेल्थ गेम्सच्या पहिल्या दिवशी भारताचं पहिलं मेडल निश्चित झालंय. ज्यूडोच्या 60 किलो वजनी गटात नवज्योत चानानं फायनलमधील आपला प्रवेश निश्चित केलंय. त्यानं सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ले ग्रॅनेजवर वाझा अरी पद्धतीनं टफ बाऊटमध्ये मात केली. आता फायनलमध्येही बाजी मारून चाना भारताला पहिलं गोल्ड मेडल पटकावून देतो का? ते पाहणं महत्तवाचं ठरणार आहे.

टेनिस

तर दुसरीकडे कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशीप वुमन्स टीम इव्हेंटमध्ये भारतीय महिलांनी बार्बाडोसविरूद्ध विजयाची नोंद केली. पाटकर आणि कुमारसन जोडीने हार्वे-रायली जोडीचा 11-4, 11-4, 9-11, 11-3 नं पराभव केला. तर सिंगल्समध्ये बात्रानं रायलिविरूद्ध 11-2, 11-5, 11-2 नं विजय संपादन केला. दुसऱ्या एका सिंगल्स मॅचमध्ये कुमारसननं फेलिक्सविरूद्ध 11-3, 11-2, 11-3 असा विजय मिळवला. तर मेन्स टीम इव्हेंटमध्ये भारतानं वानुटूला पराभवाचा धक्का दिला. अँथोनी-शेट्टी या डबल्स जोडीनं कमाल करत लिन-शिंगचा 11-6, 11-5, 11-4ने धुव्वा उडवला. तर शेट्टीने 11-6, 11-2, 7-11, 11-1, तसंच देसाईने 11-2, 11-3, 11-5 अशा विजयांची नोंद केली.
 
बॅडमिंटन

भारतीय बॅडमिंटन टीमनंही ग्लास्गो कॉमनवेल्थ गेम्समध्ये विजयी सलामी दिली आहे. ग्रुप बीमधील मिक्स मॅच इव्हेंटमध्ये भारतानं दुबळ्या घानाचा 5-0 असा फडशा पाडला. 

तर वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये ब्राँझ मेडल पटकावणारी पी.व्ही. सिंधु स्टेला अमासाविरूद्ध 21-7, 21-5 ने विजयी झाली. मेन्स डबल्समध्ये अक्षय देवलकर-प्रणव चोप्रा जोडीनं इमॅन्युएल डोंकर-अब्राहम अयिट्टे जोडीचा 21-7, 21-11 असा 22 मिनिटांत धुव्वा उडवला. 

तर ज्वाला गुट्टा-अश्विनी पोनप्पा या वुमन्स डबल्समधील भारतीय जोडीनं एवलिन बोटवे-डायना आर्चरला अस्मान दाखवत भारताची आघाडी 4-0नं वाढवली. अखेरच्या मिक्स डबल्स मॅचमध्ये पी.सी. थुलसी आणि किदम्बी श्रीकांत या जोडीने सॅम-अमाशाविरूद्ध 21-5, 21-9नं विजय झळकावला. पुढील फेरीत भारतीय बॅडमिंटन टीमसमोर आव्हान असणार आहे ते युगांडाचं

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.