भारताच्या ज्युनियर हॉकी टीमला प्रत्येकी तीन लाखांचं बक्षीस

भारतानं ज्युनियर हॉकी विश्वचषकावर नाव कोरलं

Updated: Dec 19, 2016, 12:12 AM IST
भारताच्या ज्युनियर हॉकी टीमला प्रत्येकी तीन लाखांचं बक्षीस title=

लखनऊ : भारतानं ज्युनियर हॉकी विश्वचषकावर नाव कोरलंय आहे. अंतिम सामन्यात भारतानं बेल्जियमवर 2-1 ने मात केली आहे. भारताकडून गुरुजंतसिंग आणि सिमरनजीत सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केलाय.

दुस-यांदा भारताच्या हॉकी टीमनं ज्युनियर विश्वचषकावर नाव कोरलंय. याआधी पंधरा वर्षांपूर्वी भारतानं ज्युनियर हॉकी विश्वचषकाचं जेतेपद पटकावलं होतं. या विजयानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं संघातल्या खेळाडुंना प्रत्येकी तीन लाखांच्या बक्षीसाची घोषणा केली आहे.