या पाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्सने केला भारतीय तरूणींशी विवाह

भारतीय तरूणीच्या प्रेमात अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटर घायाळ झाले. यातील ५ जणांनी तरूणींशी विवाह केला. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 6, 2017, 07:17 PM IST
या पाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्सने केला भारतीय तरूणींशी विवाह

मुंबई : भारतीय तरूणीच्या प्रेमात अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटर घायाळ झाले. यातील ५ जणांनी तरूणींशी विवाह केला. 

भारतीय तरूणींच्या प्रेमात अनेक आंतरराष्ट्रीय प्लेअर होते.  यातील काही जणांचे अफेअर होते. पण काही जणांनीच या प्रेमाला अर्थ दिला आणि विवाहात त्याचे रुपांतर केले. 

विवियन रिचर्ड याचे नीना गुप्ताशी अफेअर होते. रिचर्डकडून तिला एक मुलगीही आहे. पण त्यांनी लग्न केले नाही. 

 

पाहा कोण आहे ते 

 

Shaun Tait

 ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर शॉन टेट याने २०१४ मध्ये भारतीय मॉडेल माशूम हिच्याशी लग्न केले. 

 

Mohsin Khan

पाकिस्तानचा क्रिकेटर  मोहसिन खान यांनी १९८३ मध्ये भारतीय अभिनेत्री रिना रॉय हिच्याशी लग्न केले. 

 

Muttiah Muralitharan

श्रीलंकेचा महान गोलंदाज मुथैया मुरलीधरन याने २००५ मध्ये चेन्नईची तरूणी मधिमलार हिच्याशी विवाह केला. 

 

Shoaib Malik

पाकिस्तानचा खेळाडू शोएब मलिक याने २०१०ने टेनिस स्टार सानिया मिर्झाशी निकाह केला. 

 

Glenn Turner

न्यूझीलंडचा फलंदाज ग्लेन टर्नर याने १९७३ मध्ये सुखविंदर कौरशी विवाह केला.