३५ वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा घडली ही घटना

बांगलादेशात सुरु असलेल्या १९ वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धेत मंगळवारी वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या संघादरम्यान मुकाबला चांगलाच रोचक झाला. प्रतिस्पर्धी संघाला ११ चेंडूवर ६ रन्स हवे होते आणि हातात होता केवळ एक विकेट. 

Updated: Feb 3, 2016, 10:56 AM IST
३५ वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा घडली ही घटना title=

ढाका : बांगलादेशात सुरु असलेल्या १९ वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धेत मंगळवारी वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या संघादरम्यान मुकाबला चांगलाच रोचक झाला. प्रतिस्पर्धी संघाला ११ चेंडूवर ६ रन्स हवे होते आणि हातात होता केवळ एक विकेट. 

वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २२६ धावा केल्या. झिम्बाब्वेला १२ चेंडूत १० रन्स हवे होते आणि हातात केवळ एक विकेट होती. कुंडयी मटिगिमुने पहिल्या चेंडूवर चौकार लगावत विजयाच्या दिशेने एक पाऊल टाकले. मात्र लक्ष्य अजूनही दूर होते. पुढच्या दोन चेंडूत झिम्बाब्वेला एकही धाव काढता आली नाही. त्यानंतर पुढील तीन चेंडूत एक-एक धाव घेतली. 

त्यानंतर सहा चेंडूत झिम्बाब्वे जिंकण्यासाठी तीन रन्स हवे होते. या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूत गोलंदाजाने नॉन स्ट्रायकरच्या बाजूने उभ्या असलेल्या फलंदाजाला चेंडू टाकण्यापूर्वी रन आऊट केले. यावेळी थर्ड अंपायरचा रिव्ह्यू मागण्यात आला. थर्ड अंपायरने वेस्ट इंडिजच्या बाजूने निकाल देत बाद दाखवले आणि वेस्ट इंडिजचा दोन रन्सनी विजय झाला. ३५ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या टीमनेही अशाच प्रकारे विजय मिळवला होता.