मुंबई : सध्या क्रिकेटरच्या लग्नाचा सिझन सुरू आहे असं वाटतं आहे. रैना आणि भज्जी यांच्या लग्नानंतर आता घोड्यावर बसण्याचा नंबर आहे रोहित शर्मा याचा...
एका इंग्रजी वेबसाइटने क्रिकेट कंट्रीने दावा केला आहे की, रोहित आणि रितिका यांच्या लग्नाची तारीख फिक्स झाली आहे. दोघे डिसेंबर महिन्यात लग्न करणार आहेत.
दरम्यान, या संदर्भात रोहितने काही वक्तव्य केले नाही. पण वेबसाइटनुसार ७ डिसेंबरला आफ्रिकेसोबत टेस्ट सिरिज संपत आहे त्यानंतर १३ तारखेला ते लग्न बंधना अडकण्याची शक्यता आहे.
रोहित शर्माने ३० कोटींचा फ्लॅट खरेदी केला आहे त्यामुळे तो लवकरात लवकर लग्न करून आपल्या नव्या घरात जाऊ इच्छितो आहे.
जानेवारी महिन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जात आहे. त्या दौऱ्यावर पूर्वी त्याला लग्नाच्या बेडीत अडकायचे आहे. हे लग्न मुंबईत होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.