IPLमध्ये हे पाच भारतीय खेळाडू होऊ शकतात मॅक्सवेल

दरवर्षी आयपीएलमध्ये एखादा अनोळखी चेहरा स्टार म्हणून सर्वांसमोर येतो. या आयपीएलमध्येही असे काही खेळीडू आहेत की जे याआधी स्पॉट लाईटमध्ये नव्हते. मात्र त्यांच्या प्रदर्शनाने सर्वांना आश्चर्यचकीत करण्यास तयार आहेत. तर कोण आहेत ते खेळाडू जे आजवर स्पॉट लाईटमध्ये नव्हते. 

Updated: Apr 9, 2015, 08:28 PM IST
IPLमध्ये हे पाच भारतीय खेळाडू होऊ शकतात मॅक्सवेल title=

नवी दिल्ली : दरवर्षी आयपीएलमध्ये एखादा अनोळखी चेहरा स्टार म्हणून सर्वांसमोर येतो. या आयपीएलमध्येही असे काही खेळीडू आहेत की जे याआधी स्पॉट लाईटमध्ये नव्हते. मात्र त्यांच्या प्रदर्शनाने सर्वांना आश्चर्यचकीत करण्यास तयार आहेत. तर कोण आहेत ते खेळाडू जे आजवर स्पॉट लाईटमध्ये नव्हते. 

आयपीएल-८साठीच्या बोलीदरम्यान मुंबईच्या टीमसाठी खेळणाऱ्या श्रेयस अय्यरसाठी केकेआर आणि दिल्ली डेअरडेविल्स मोठी स्पर्धा झाल्याचे दिसले होते. मात्र केकेआरला मागे सारत दिल्ली डेअरडेविल्सने श्रेयसला 2.6 कोटी रुपये खर्च करून आपल्या टीमसाठी खरेदी केले. श्रेयसची बेस प्राईज 10 लाख रुपये होती. श्रेयसने रणजी ट्रॉफीमध्ये 50.56च्या सरासरीने 809 रन बनवले होते. याच प्रदर्शनाच्या जोरावर दिल्लीने त्याला खरेदी केले आहे.

युवराज सिंग आयपीएल-8मधील सर्वात महाग खेळाडू ठरला आहे. मात्र त्याच्यापेक्षा जास्त प्रसिद्धी कुर्गकडून खेळणाऱ्या 20 वर्षीय के.सी. करियप्पाला मिळाली आहे. करियप्पा लेग स्पीन बॉलर आहे. कर्नाटक प्रिमिअर लीगमध्ये बिर्जापूर बुल्सकडून खेळताना या खेळाडूने लेग स्पीन अॅक्शन न बदलता ऑफ स्पीन करून सर्वांनाच आश्चर्यचकीत केले होते. त्याच्या याच विलक्षण कामगिरीच्या जोरावर केकेआरने त्याला 2.4 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. 

मुंबई ज्यूनिअर टीममधून खेळणाऱ्या 17 वर्षीय सरफराज खानने लहान वयातच वादविवादांसोबत आपलं नातं जोडलं होतं. आपल्या टीमच्या शिस्तभंगाच्या मुद्यावरून चर्चेत आलेल्या या खेळाडूला आरसीबीने खरेदी केले आहे. सरफराज त्याच्या आक्रमक बॅटिंगसाठी प्रसिद्ध आहे. ज्याची छोटी झलक 2014च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये पाहायला मिळाली. या वर्ल्ड कपमध्ये त्याने 70.33च्या सरासरीने आणि 105.50च्या स्ट्राईक रेटने 211 रन बनवले होते. रणजीमध्ये पहिली मॅच सरफराज मुंबईतर्फे खेळला होता. मात्र नंतर त्याना टीममधून बाहेर करण्यात आले होते. 

केरळच्या जियस या खेळाडूला मॅक्सवेलच्या नावाने ओळखले जाते. असं नाही की तो मॅक्सवेलसारखे फोर-सिक्स मारतो. त्याला कारण असं आहे की त्याचा चेहरा मॅक्सवेलच्या चेहऱ्याशी मिळता-जुळता आहे. जियासच्या टॅलेंन्टला दिल्लीने ओळखले आणि त्याला आयपीएल-8साठी आपल्या टीममध्ये सामील करून घेतले आहे.

सनरायजर्स हैदराबादचे सर्व खेळाडू आयपीएलच्या तयारीत व्यस्त असतांना त्यांचा एक खेळाडू कटकमध्ये सुरू असलेल्या सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीमध्ये हैदराबादकडून बॉलिंग करत आहेत. त्या खेळाडूचं नाव आहे मिलिंद. मिलिंदला आयपीएल-7मध्ये मैदानात खेळण्याची संधी नव्हती मिळाली. मात्र यावेळी त्याला मैदानात आपला खेळ दाखवण्याची संधी मिळण्याची आशा आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.