इंग्लंडचा कूक आजच तोडणार सचिनचं रेकॉर्ड ?

संपूर्ण देशात सध्या आयपीएलची धूम आहे. पण दुसरीकडे इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टला सुरुवात झाली आहे.

Updated: May 19, 2016, 03:51 PM IST
इंग्लंडचा कूक आजच तोडणार सचिनचं रेकॉर्ड ? title=

लीड्स: संपूर्ण देशात सध्या आयपीएलची धूम आहे. पण दुसरीकडे इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टला सुरुवात झाली आहे. या मॅचमध्ये एक असा क्रिकेटर आहे की जो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. 

कोण आहे तो क्रिकेटर... 

इंग्लडचा कर्णधार अॅलिस्टर कूक या टेस्टमध्ये ३६ रन्स केले. तर क्रिकेटच्या इतिहासात १० हजार रन्स करणारा सर्वात तरूण खेळाडू होणार आहे. या मॅचमध्ये टॉस जिंकून श्रीलंकेनं इंग्लंडला पहिले बॅटिंगला पाठवलं. त्यामुळे आजच कूक सचिनचं हे रेकॉर्ड तोडण्याची शक्यता आहे. 

सचिनने कधी केला होता रेकॉर्ड...

सचिन तेंडुलकरने २००५ मध्ये पाकिस्तान विरोधात दोन्ही इनिंगमध्ये ५२-५२ धावा करून टेस्ट क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा आकडा पार केला होता. १० हजार धावा केल्या त्यावेळी सचिनचे वय ३१ वर्ष ११ महिने होते. 

कूकचे वय किती... 

अॅलिस्टर कूकने आगामी सिरीजमध्ये ३६ धावा केल्यावर सचिनचा विक्रम तोडणार आहे.  आता कूकचे वय ३१ वर्ष सहा महिने आहे. 

इंग्लड खेळाडूचा वेगळा विक्रम 

इंग्लडकडून १० हजार धावा करणारा कूक हा पहिला खेळाडू ठरणार आहे. तर क्रिकेट जगतातील १२ खेळाडू होणार आहे. कूकने ४६.५६ च्या सरासरीने १२६ सामन्यात ९९६४ धावा केल्या आहेत. 

कधी केले होते पदार्पण

कूकने आपल्या टेस्ट करिअरला २००६ मध्ये सुरूवात केली होती. त्यावेळी १२७ च्या विध्वंसकारी सरासरीने ७ इनिंगमध्ये ७६६ धावा केल्या. तसेच २०११मध्ये इंग्लंडच्या अॅशेस सिरीज जिंकण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. 

लिस्टमध्ये कोण कोण आहे

सचिन तेंडुलकर, संगकारा, राहुल द्रविड, सुनील गावस्कर, अॅलन बॉर्डर आणि इतर १२ जण आहेत.