विराट कोहलीला याड लागलं याड लागलं, पाहा काय केलं?

 मैदानावर सैराट झालेला विराट कोहलीने पंजाबच्या गोलंदाजांची फिसे काढलीत. आयपीएलमध्ये ४ शतक ठोकण्याचा नवा विक्रम केला.

Updated: May 19, 2016, 03:31 PM IST
विराट कोहलीला याड लागलं याड लागलं, पाहा काय केलं? title=
छाया - पीटीआय

बंगळुरु : कसोटी कर्णधार विराट कोहलीला खेळण्याचं जणू याड लागलंय. मैदानावर सैराट झालेला विराट कोहलीने पंजाबच्या गोलंदाजांची फिसे काढलीत. आयपीएलमध्ये ४ शतक ठोकण्याचा नवा विक्रम आपल्या नावावर करताना रन्समध्येच आपण वाघ असल्याचे दाखवून दिलेय. विराटच्या हाताला लागले असताना त्यांने मोठी खेळी करत आपल्या टीमला मोठा विजय मिळवून दिलाय.

विराट पराक्रम

सामन्यापूर्वी कोहलीच्या डाव्या बोटाला दुखापत झाली होती, पण त्याची तमा न बाळगता कोलहीने फटक्यांची अतिषबाजी करत आयपीएलमधील चौथे शतक झळकावले, त्याचबरोबर आयपीएलमध्ये एका हंगामात ८०० धावांचा विक्रमही त्याने रचला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याची दहा षटके वाया गेली असली त्यानंतर मैदानात कोहली बरसला. 

त्यांच्या स्वप्नांना सुरुंग

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने किंग्ज इलेव्हन पंजाबपुढे १५ षटकांत २११ धावांचा डोंगर रचला. पावसामुळे या सामन्याच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. पण पाऊस थांबल्यावर सामना सुरु केला. पावसामुळे खेळपट्टी ओली झाली होती तर मैदान निसरडे झाले होते. त्यामुळे नाणेफक जिंकत पंजाबने बंगळुरुला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. कमीत धावांमध्ये बंगळुरुला बाद करण्याचे स्वप्न पंजाबचा संघ बघत होता. पण त्यांच्या स्वप्नांना ख्रिस गेल आणि कोहली यांनी सुरुंग लावला. 

गोलंदाजीची पिसे काढली

कोहलीने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले होते. दुसऱ्या बाजूने गेल संयतपणे फलंदाजी करत होता. कायले अ‍ॅबॉटच्या चौथ्या षटकात गेलने फटकेबाजीला सुरुवात केली आणि त्यानंतर या दोघांनीही पंजाबच्या गोलंदाजीची पिसे काढली. 

विराटचा धडाका

गेलने ३२ चेंडूंमध्ये चार चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर ७३ धावांची धडाकेबाज खेळी केली. गेल बाद झाल्यावर कोहलीच्या धावांचा ओघ आटला नाही, उलट त्याने दुपटीने पंजाबच्या गोलंदाजांवर प्रहार करायला सुरुवात केली. कोहलीने फक्त ५० चेंडूंत १२ चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर ११३ धावांची झंझावाती खेळी साकारली.