रिओ दि जानेरो : ऑलिम्पिक म्हटलं म्हणजे अनेक विक्रम होतात आणि अनेक विक्रम तुटतात. पण आता आम्ही तुम्हांला अशी बातमी सांगणार आहोत, ती मैदानातील नाही तर मैदानाबाहेरची आहे.
रिओच्या गेम्स व्हिलेजमध्ये अवघ्या तीन दिवसात ४ लाख ५० हजार कंडोमचे वाटप करण्यात आले आहे. लंडन येथील क्वीन मेरी विद्यापीठाचे स्पोर्ट्स मेडिसिनचे प्राध्यापक निकोला मालफुल्ली यांनी जगातील विविध स्पर्धांवेळी किती कंडोम वाटले जाता याचा सर्व्हे केला होता.
याबाबत अधिक माहिती देताना निकोला म्हणाले, एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्या तीन दिवसात कंडोम वाटप होण्याची ही पहिलीच वेळ असून अथेन्स्, बीजिंग आणि लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत मी वैद्यकिय अधिकारी म्हणून काम केले आहे. पण त्या तिन्ही वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात मागणी झाली नव्हती. या स्पर्धेत अशीच जर मागणी राहिली तर कंडोमचा तुटवडा नक्कीच भासणार आहे. त्यांनी असेही सांगितले की, वैद्यकिय शास्त्रानुसार जर खेळाडूने सामन्याच्या आधी कोणत्याही पुरूष आणि महिला खेळाडूने सेक्स केले तर दोघांच्याही कामगिरीवर चांगला परिणाम होतो. त्याच्या कॅलेरीज सुध्दा वाढतात. अनेक प्रकारच्या खेळांचे खेळाडू कंडोमचा उपयोग करतात.
क्रीडा क्षेत्रात सेक्स करणे हे उत्तेजक प्रकारात येत नसल्यामुळे खेळाडू कंडोमचा जास्त उपयोग करतात. ऑलिम्पिक स्पर्धेत कंडोम वाटण्याची प्रथा १९८८ मध्ये सोऊल येथून झाली.