राज्याच्या पॅरा-क्रिकेट टीममध्ये दोन्ही हात नसणारा क्रिकेटर

क्रिकेट खेळतो, तो आपली दाढी आणि खांदा यात बॅट धरून क्रिकेट.

Updated: Mar 2, 2016, 04:45 PM IST

जम्मू-काश्मीर : आमिर हुसेन लोन हा २६ वर्षाचा काश्मिरी युवक आपले दोन्ही हात नसताना, क्रिकेट खेळतो, तो आपली दाढी आणि खांदा यात बॅट धरून क्रिकेट खेळतो, तर पायाने हातापर्यंत उंच पाय नेऊन बॉलिंगही करतो, तो आता जम्मू काश्मिरच्या पॅरा-क्रिकेट टीममधून खेळतोय.

तो आठ वर्षाचा असताना वडिलांच्या लाकडी वखारीत त्याचे हात गेले, यानंतर त्याच्या वडिलांनी उपचारांसाठी जमीनही विकली मात्र त्याला कायमचे अपंगत्व आले. 

आमिरला आयुष्यात निराश करणारे अनेक लोक भेटले पण त्याने आत्मविश्वास अढळ होऊ दिला नाही, त्याला शिक्षकांनी आता शिकू नकोस, घरीच राहा काही फायदा नाही, असं सांगितलं तरीही त्याने आपले शिक्षण पूर्ण केले.