मुंबई : आजपर्यंत अनेक मोठ्या भारतीय खेळाडूंना नाही जमलं ते आर. अश्विन याने करुन दाखवलं. आर. अश्विन हा आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये ऑलराऊंडर म्हणून पहिल्या स्थानकावर पोहोचला आहे.
टॉप १० फलंदाजांमध्ये एकही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. न्यूझिलंडचा केन विलियम्स फलंदाजीमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. अश्विनची टेस्ट मॅचमध्ये सर्वात जास्त 124 रन्स बनवले आहेत. अश्विनने दक्षिण अफ्रीकेच्या विरोधात 31 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे गोलंदाजांमध्ये तो डेल स्टेन याच्यानंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.