म्हणून अश्विनला करावा लागला मेट्रोनं प्रवास

भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विनला चेन्नईमध्ये मेट्रोनं प्रवास करावा लागला आहे.

Updated: Jan 24, 2017, 05:57 PM IST
म्हणून अश्विनला करावा लागला मेट्रोनं प्रवास  title=

चेन्नई : भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विनला चेन्नईमध्ये मेट्रोनं प्रवास करावा लागला आहे. चेन्नईमध्ये सुरु असलेल्या जलईकट्टूबाबतच्या आंदोलनामुळे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनामुळे अश्विनला स्वत:च्या गाडीनं घरी जाता आलं नाही. शेवटी त्यानं चेन्नई विमानतळावरून मेट्रोनं प्रवास केला.

मेट्रोनं प्रवास करतानाचा फोटो अश्विननं ट्विटरवर शेअर केला आहे. चेन्नईतल्या परिस्थितीमुळे मेट्रोचा आधार घ्यावा लागला. विमानतळावर असलेल्या पोलिसांनी मला सुरक्षित ठेवल्याबद्दल त्यांचे आभार, असं या ट्विटमध्ये अश्विन म्हणाला आहे.