एशियन गेम्स : अभिनव बिंद्राला एअर रायफलमध्ये कांस्य पदक

एशियन गेम्समध्ये भारताने चांगली कामगिरी केलेय. भारताच्या अभिनव बिंद्राने कांस्य पदक पटकावले. एशियन गेम्स स्पर्धा आपल्यासाठी शेवटीच असेल, असे ट्विट अभिनव बिंद्रा यांने केले. त्यामुळे त्याने जवळपास निवृत्ती स्वीकारल्याचे दिसत आहे.

Updated: Sep 23, 2014, 10:09 AM IST
एशियन गेम्स : अभिनव बिंद्राला एअर रायफलमध्ये कांस्य पदक

इंचियोन : एशियन गेम्समध्ये भारताने चांगली कामगिरी केलेय. भारताच्या अभिनव बिंद्राने कांस्य पदक पटकावले. एशियन गेम्स स्पर्धा आपल्यासाठी शेवटीच असेल, असे ट्विट अभिनव बिंद्रा यांने केले. त्यामुळे त्याने जवळपास निवृत्ती स्वीकारल्याचे दिसत आहे.

एशियन गेम्समध्ये भारताला १० मीटर एअर रायफलमध्ये अभिनव बिंद्राला कांस्य पदक मिळाले, हे नववे पदक असून २५ मीटर रॅपिड फायर पिस्टल प्रकारात गुरप्रित आणि तमांगला सांघिक कांस्य पदक मिळाले.

Tomorrow will mark the end of my professional shooting life ! I will however still shoot , compete as a hobby shooter training twice a week.

— Abhinav Bindra (@Abhinav_Bindra) September 22, 2014

And yes I will still try to be at rio and my bio is now most appropriate ! Great times and am sure there will be a few more !

— Abhinav Bindra (@Abhinav_Bindra) September 22, 2014

याआधी सौरव घोषाल आणि दीपिका पल्लिकल यांनी स्क्वॅश कोर्टवर सोमवारी इतिहास रचला, तर नेमबाजांनी पदक पटकाविण्याची मोहीम कायम राखली. १७ व्या एशियन गेम्स स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताला आपल्या खात्यात दोन कांस्यपदकांची भर घालण्यात यश आले. 

महिला पिस्तूल संघ, स्क्वॅशपटू घोषाल आणि पल्लिकल आणि महिला हॉकी संघाचा अपवाद वगळता अन्य क्रीडा प्रकारांमध्ये मात्र भारतीय खेळाडूंनी निराशा केली. पुरुष फुटबॉल संघ आणि टेनिस संघाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.