इंचियोन : एशियन गेम्स स्पर्धेत भारतीय तिरंदाजी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत पुरुष सांघिक कंपाउंड प्रकारात सुवर्णपदक पटकाविले आहे. भारतीय संघाने यजमान दक्षिण कोरिया संघाचा 227-224 असा पराभव केला.
भारतीय तिरंदाजांनी मोठ्या स्पर्धांमध्ये मिळविलेले हे पहिले सुवर्णपदक आहे. या स्पर्धेत भारताला मिळालेले हे दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी नेमबाज जितु राय याने सुवर्णपदक मिळविले होते.
भारतीय तिरंदाज रजत चौहान, संदीप कुमार आणि अभिषेक वर्मा यांनी मारलेल्या तीरांनी अचूक लक्ष्य केले.
भारतीय महिला तिरंदाजांनीही ब्राँझपदक मिळविण्यात यश मिळविले. तृषा देव, पुर्वशा शेंडे आणि सुरेखा ज्योती या भारतीय महिला तिरंदाजी संघातील खेळाडूंनी इराणचा 217-224 असा पराभव केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.