भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफाइनलमध्ये कसे असेल सिडनीचे पिच?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सेमीफायनलचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. तेथील पिचची पाहणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मैदान आणि पिच समितीचे प्रमुख एंटी एटकिंसन यांनी केली आहे.

Updated: Mar 23, 2015, 07:26 PM IST
भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफाइनलमध्ये कसे असेल सिडनीचे पिच?  title=

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सेमीफायनलचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. तेथील पिचची पाहणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मैदान आणि पिच समितीचे प्रमुख एंटी एटकिंसन यांनी केली आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सेमीफायनल सामन्यातील पिचबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. सिडनीच्या पिचवर स्पिनर्सना मदत मिळणार नाही, असेही ऑस्ट्रेलियाच्या टीमकडून सांगण्यात येत आहे.

ग्लेन मॅक्सवेलला पिचवर गवत असण्याची अपेक्षा आहे, मात्र जेम्स फॉकनरने याला नकार दिला आहे. कारण जेपी डुमिनी आणि इमरान ताहिर यांनी, श्रीलंका टीमला याच पिचवर हैराण केले होते.

आता एटकिंसन यांची भूमिका काय असेल यावर सर्वांचे लक्ष आहे. कारण एटकिंसन मुख्य क्यूरेटर टॉम पार्कर आणि स्थानिय मैदानातील कामगारांना काय आदेश देतात यांवर बरेच काही अवलंबून आहे.

सकाळी जेव्हा भारतीय टीम सरावासाठी मैदानात पोहचली, तेव्हा रवि शास्त्री, महेंद्र सिंह धोनी, भरत अरूण आणि अरशद अयूब थेट पिचची पाहणी करण्यास गेले. भारताचे कोच डंकन फ्लेचर एटकिंसन यांच्याशी बातचित करत होते.  कदाचित डंकन फ्लेचर यांनी पिचबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला असेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.