ऑस्ट्रेलियाचा कर्णधार क्लार्क होणार निवृत्त

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याने निवृत्तीची घोषणा केली आहे. वर्ल्डकप २०१५ च्या फायनलनंतर आपण निवृत्ती स्वीकारु असे मायकेल याने म्हटले आहे.

Reuters | Updated: Mar 28, 2015, 09:36 AM IST
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार क्लार्क होणार निवृत्त title=

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याने निवृत्तीची घोषणा केली आहे. वर्ल्डकप २०१५ च्या फायनलनंतर आपण निवृत्ती स्वीकारु असे मायकेल याने म्हटले आहे.

वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत रविवारी घरच्या मैदानावर न्यूझीलंड होणाऱ्या अंतिम सामन्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची घोषणा मायकेल क्लार्क याने शनिवार केली. मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेल्या पत्रकार परिषदेत ३३ वर्षीय क्लार्कने निवृत्तीची घोषणा केली. 

क्लार्कने आतापर्यंत २४४ एकदिवसीय सामने खेळले असून ७,९०७ धावा केल्या आहेत. क्लार्कने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असली तरी तो कसोटी क्रिकेट खेळत राहणार आहे. वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत क्लार्क दुसऱ्यांदा खेळणार आहे. यापूर्वी २००७ च्या वर्ल्डकप विजयी संघात क्लार्क खेळला होता.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये थांबण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मला वाटते. या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या संघाच्या कामगिरीवर मी खूप खूश आहे. अंतिम सामन्यासाठी आमचा संघ सज्ज आहे. उद्याचा सामना हा माझा शेवटचा सामना असणार आहे, असे मायकेल म्हणाला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x