संयमाने फलंदाजी करायला हवी होती - धोनी

पुण्यातील गहुंजे मैदानावर झालेला पराभव केवळ खेळपट्टीमुळेच नव्हे तर त्या पराभवासाठी भारताचे फलंदाजही जबाबदार असल्याचे कर्णधार धोनीने म्हटलेय. 

Updated: Feb 11, 2016, 01:43 PM IST
संयमाने फलंदाजी करायला हवी होती - धोनी title=

पुणे : पुण्यातील गहुंजे मैदानावर झालेला पराभव केवळ खेळपट्टीमुळेच नव्हे तर त्या पराभवासाठी भारताचे फलंदाजही जबाबदार असल्याचे कर्णधार धोनीने म्हटलेय. 

पहिल्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला अवघ्या १०१ धावा करता आल्या. खेळपट्टी गोलंदाजीला पोषक होती. त्याचाच फायदा श्रीलंकेच्या गोलंदाजांनी उचलला आणि भारतीय टीमला नाकीनऊ आणले. शंभर धावांचा पल्ला गाठताना भारताची पुरेपूर दमछाक झाली. अश्विनव्यतिरिक्त एकाही क्रिकेटपटूला मैदानावर अधिक काळ तग धरता आला नाही. 

सामन्यातील फलंदाजांच्या चुकामुळे पराभव पदरी पडला. खेळपट्टीवर चेंडू उसळी घेत होता. त्यामुळे मोठे फटके मारण्यास वाव मिळत नव्हता. आणखी २५ ते ३० धावा झाल्या असत्या तर कदाचित निकाल वेगळा असता असं धोनीने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. पुढील सामन्यात या चुका टाळून खेळ करु असेही धोनी म्हणाला.