मुंबई: पुढील वर्षी ११ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत भारतातील आठ शहरांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप रंगणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानात वर्ल्डकपची फायनल मॅच रंगेल.
बंगळुरू, चेन्नई, धर्मशाळा, मोहाली, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली आणि कोलकाताच्या स्टेडियम्सवर टी-२० वर्ल्डकपच्या मॅचेस होणार आहेत.
चार वर्षांपूर्वी भारतात झालेल्या वर्ल्डकप दरम्यान कोलकाताला कोणताही मोठा सामना खेळला गेला नाही. भारत आणि इंग्लंड दरम्यान मॅच बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. कारण ईडन गार्डनचं दुरुस्तीचं काम पूर्ण झालं नव्हतं. यापूर्वी ईडन गार्डनवर १९८७ रिलायंस कप फायनल आणि १९९६ वर्ल्डकप सेमीफायनल मॅच खेळली गेली होती.
आयसीसी आणि बीसीसीआयच्या मापदंडावर योग्य उतरल्यानंतरच या ठिकाणी मॅच होतील. भारतात पहिल्यांदाच टी-२० वर्ल्डकप खेळला जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.