महिलांसाठी आयपीएल सारखी लीग सुरु करण्याच्या विचारात बीसीसीआय

जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणजे आयपीएल. आयपीएलमुळे अनेक मोठे-मोठे बदल क्रिकेटमध्य़े पाहायला मिळाले. बीसीसीआय पुरुष आयपीएलनंतर आता महिलांसाठी देखील आयपीएल सारखी एक लीग सुरु करण्याच्या विचारात आहे. महिला क्रिकेट संघाकडून परवानगी मिळाल्यानंतर याबाबत पुढचा निर्णय होणार आहे. 

Updated: Jun 12, 2016, 06:47 PM IST
महिलांसाठी आयपीएल सारखी लीग सुरु करण्याच्या विचारात बीसीसीआय title=

मुंबई : जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणजे आयपीएल. आयपीएलमुळे अनेक मोठे-मोठे बदल क्रिकेटमध्य़े पाहायला मिळाले. बीसीसीआय पुरुष आयपीएलनंतर आता महिलांसाठी देखील आयपीएल सारखी एक लीग सुरु करण्याच्या विचारात आहे. महिला क्रिकेट संघाकडून परवानगी मिळाल्यानंतर याबाबत पुढचा निर्णय होणार आहे. 

बीसीसीआयचे नवे अध्यक्ष अनुराग ठाकूर हे याबाबत योजना आखत आहेत. महिला संघांना प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआय काही नवीन आयडीया घेवून येणार आहेत. 

अनुराग ठाकुर म्हणतात की, बीसीसीआयला भारतीय महिला टीम जगात पहिल्या स्थानावर पाहायची आहे. याबाबत महिला कमिटीकडे विचारणा करण्यात आली असून पुढील काही वर्षात याबाबत निर्णय घेण्यात येईल. असं त्यांनी म्हटलं आहे.