कॅनबेरा : फोर, सिक्स लगावत वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल झिम्बाब्वे बॉलरसाठी कर्दनकाळ ठरला. गेलच्या वादळापुढे झिम्बाब्वे बॉलर सपशेल अपयशी ठरलेत. फोर आणि सिक्सची आतषबाजी करत ख्रिस गेलने शानदार द्विशतकी केले. वेस्ट इंडीजने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी ३७३ रन्सचा डोंगर उभा केला.
क्रिस गेलने १३८ चेंडूत २१५ धावांची शानदार खेळी केली तर त्याला मोलाची साथ दिली मार्लेन सॅम्युअल याने त्याने १३३ धावांची जबरदस्त खेळी केली. या सामन्यात वेस्टइंडिजच्या या दोन्ही धडाकेबाज फलंदाजांनी अनेक विक्रम तोडले. टाकू या एक नजर त्या विक्रम्सवर....
१) क्रिस गेलने आज वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम बनविला. गेलने २१५ धावांची खेळी केली. या पूर्वी साऊथ आफ्रिकेच्या गॅरी कर्स्टन याने १९९६ च्या वर्ल्ड कपमध्ये १८९ धावांची खेळी केली होती. हा विक्रम गेलने तोडला.
२) क्रिस गेलने आजपासून पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी २४ फेब्रुवारीला ग्वालियर येथे सचिनने बनविलेल्या २०० धावांचा विक्रम मोडला.
३) द्विशतक लगावणारा गेल हा वेस्ट इंडिजचा पहिला फलंदाज बनला आहे.
४) गेलने वेस्ट इंडिजच्या विवियन रिचर्ड्सच्या १८९ धावांचा विक्रम मोडला. या पूर्वी रिचर्ड्सच्या नावावर वन डेमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम होता. तो गेलने आपल्या नावावर केला आहे.
५) १९९९ वर्ल्ड कपमध्ये राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी श्रीलंकेविरुद्ध ३१८ धावांचा केलेला विक्रम गेल आणि सॅम्युअलने आज झिम्बाब्वेविरूध ३७२ धावा बनवून मोडला.
६) रोहित शर्मा आणि सेहवागनंतर वन डे मध्ये सर्वाधिक धावंसख्या (२००+) बनविण्याचा विक्रमात गेलचे नाव जोडले गेले आहे. रोहित शर्मा २६४ आणि सेहवाग २१९ धावांचा विक्रम आहे.
७) क्रिस गेल भारताखेरीज जगातील पहिला फलंदाज आहे की ज्याने वन डेमध्ये द्विशतक झळकावले. या पूर्वी तेंडुलकर, सेहवाग आणि रोहित शर्मा (दोन) यांचा द्विशतकांचा विक्रम होता.
८) गेलने आज वनडे क्रिकेटमध्ये ९००० धावा पूर्ण केल्यात. लारानंतर ९००० धावांचा पल्ला गाठणारा दुसरा फलंदाज बनला आहे.
९) गेल आणि सॅम्युअल्सने वर्ल्ड कप खेरीज वन डेमध्ये सर्वाधिक धावांची भागीदारी करण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी तेंडुलकर आणि द्रविड यांनी न्यूझीलंड विरूद्ध ३३१ धावांची भागीदारी केली होती.
१०) क्रिस गेलचा हा वैयक्तिक सर्वाधिक स्कोअर आहे. यापूर्वी त्याने झिम्बाब्वे विरूद्धच १५३ धावा केल्या होत्या. गेलने आपल्या करिअरमध्ये चौथ्यांदा १५० धावांचा टप्पा पार केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.