MUST WATCH: 6 यार्डापेक्षाही कमी अंतरावर लागला छक्का

क्रिकेटच्या इतिहासातील एका चेंडूवर हा सर्वात कमी अंतरावरील सिक्स ठरला आहे. चेंडू फलंदाजाने केवळ १० पाऊलांवर फटकावला आणि त्याला मिळाले सहा रन्स. हे सहा रन्स चेंडू सीमारेषेच्या पार गेला नाही. मैदानावर पळूनच सहा रन्स झाले. यातील केवळ एक रन फलंदाजांनी पळून काढला. 

Updated: Sep 15, 2014, 03:01 PM IST
MUST WATCH: 6 यार्डापेक्षाही कमी अंतरावर लागला छक्का  title=

मुंबई : क्रिकेटच्या इतिहासातील एका चेंडूवर हा सर्वात कमी अंतरावरील सिक्स ठरला आहे. चेंडू फलंदाजाने केवळ १० पाऊलांवर फटकावला आणि त्याला मिळाले सहा रन्स. हे सहा रन्स चेंडू सीमारेषेच्या पार गेला नाही. मैदानावर पळूनच सहा रन्स झाले. यातील केवळ एक रन फलंदाजांनी पळून काढला. 

हा चेंडू श्रीलंका आणि पाकिस्तान दरम्यान खेळविण्यात आलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात टाकला गेला. 

या सामन्यात श्रीलंकेच्या स्पिनरने चेंडू टाकला आणि पाकिस्तानच्या फलंदाजाने चेंडून स्वीप केला पण चेंडू बॅटेची कड घेऊन हवेत उडाला आणि विकेट किपरच्या मागे ठेवण्यात आलेल्या हेल्मेटला जाऊन लागला. संघकारा विकेट किपर होता, त्याने त्याच्या मागे दहा पाऊलांवर त्याचे हेल्मेट ठेवले होते. चेंडून हेल्मेटला लागला म्हणून स्टीव बकनर यांनी पाकिस्तानी संघाला पेनल्टी म्हणून पाच रन्स दिले आणि धावून १ रन काढला होता. 

नियमानुसार मैदानात क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेट आणि टोपीमुळे चेंडू अडविला गेला तर त्या प्रसंगी फलंदाजी करणाऱ्या संघाला ५ रन्स देण्यात येतात. 

पाहा हा व्हिडिओ... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.