हरदा : क्रिकेट खेळताना करंट लागून एका १४ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना मध्य प्रदेशच्या हरदा येथील मदिना कॉलनीत झाले आहे.
हरदा पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार मदिना कॉलनीमध्ये काल काही मुले क्रिकेट खेळत होते. त्यावेळी मैदानाच्या जवळच असलेल्या खड्ड्यात चेंडू पडला. यावेळी अशोक पासी नावाचा १४ वर्षीय मुलगा चेंडू उचलायला गेला. खड्ड्यात विजेच्या तारा होत्या. त्यावेळी त्याला करंट लावला आणि तो बेशुद्ध झाला.
त्यावेळी खेळणाऱ्या मुलांनी त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.