नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटर युवराज सिंग येत्या 30 नोव्हेंबरला अभिनेत्री हेजल कीच हिच्यासोबत लग्नबंधनात अडकतोय.
गुरुवारी युवराज संसद परिसरात दिसला. त्याच्या हातात लग्नाच्या पत्रिका होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी तो संसदेत आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, युवराजने पंतप्रधान मोदींना लग्नात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलेय.
30 नोव्हेंबरला चंदीगढ येथील गुरुद्वारामध्ये त्याचे लग्न होणार आहे. त्यानंतर 2 डिसेंबरला हिंदू प्रथेनुसार गोव्यात ते पुन्हा विवाहबद्ध होतील. 11 नोव्हेंबरला हेजल आणि युवराजचा साखरपुडा झाला होता. या लग्नासाठी युवराजने टीम इंडियाच्या खेळाडूंनाही निमंत्रण दिलेय.
लग्नानंतर 5 डिसेंबरला छत्तरपुर येथील फार्म हाऊसमध्ये संगीतचे आयोजन कऱण्यात आले. त्यानंतर 7 डिसेंबरला सेव्हन स्टार हॉटेलमध्ये शानदार रिसेप्शनही होईल. या रिसेप्शनला राजकारणी, खेळाडू तसेच बॉलीवूड कलाकार उपस्थित असतील.
युवराजने दोन आठवड्यांपूर्वी डिनर पार्टी दिली होती. युवराजच्या पत्रिकेची थीम वेगळीच आहे. त्यांच्या लग्नाच्या थीमचे नावही हटके आहे ते म्हणडे 'युवराज-हेजल प्रीमियर लीग'.