'आयपीएल'नं फोडला पोलीस कर्मचाऱ्याचा डोळा!

क्रिकेटच्या मैदानातील आणखी एक दूर्घटना समोर आलीय.  आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात शनिवारी झालेल्या सामन्यात डेविड मिलरने मारलेल्या सिक्सरमुळे एका पोलिस कर्मचाऱ्याला आपला डोळा गमवावा लागलाय.  

Updated: May 14, 2015, 04:58 PM IST
'आयपीएल'नं फोडला पोलीस कर्मचाऱ्याचा डोळा! title=

नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानातील आणखी एक दूर्घटना समोर आलीय.  आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात शनिवारी झालेल्या सामन्यात डेविड मिलरने मारलेल्या सिक्सरमुळे एका पोलिस कर्मचाऱ्याला आपला डोळा गमवावा लागलाय.  

कोलकाता नाईट रायडरच्या आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर किंग्ज इलेव्हन पंजाबचा खेळाडू डेविड मिलरने सिक्सर ठोकला. हा चेंडू थेट ५३ वर्षीय आलोक आइच यांच्या उजव्या डोळ्यावर जाऊन धडकला. आलोक आइच हे पोलीस कर्मचारी आहेत.

 जखमी झालेल्या आइच यांना तात्काळ बंगालच्या क्रिकेट असोसिएशनच्या मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना अलिपूर हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. इथं सध्या आलोक यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, त्यांचा उजवा डोळा कायमचा निकामी झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय. 

दरम्यान, पोलीस प्रशासनाने आइच यांच्या कुटुंबीयांना सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र, आयपीएल प्रशासनाकडून अजून कुठलीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.