मार्टिन क्रोच्या निधनानंतरही भाऊ जेफ क्रो भारताच्या सामन्यात अधिकारी

 न्यूझीलंडचा माजी कर्णधार मार्टिन क्रो यांच्या निधनाने संपूर्ण क्रिकेट जगताला आज धक्का बसला.  या निधनाचे सर्वाधिक दुःख मार्टिन क्रो यांचा मोठा भाऊ जेफ क्रोला होते. पण तरीही त्यांनी आज आपलं कर्तव्य पार पाडले. 

Updated: Mar 3, 2016, 09:56 PM IST
मार्टिन क्रोच्या निधनानंतरही भाऊ जेफ क्रो भारताच्या सामन्यात अधिकारी title=
सौजन्य - गेट्टी इमेज

ढाका :  न्यूझीलंडचा माजी कर्णधार मार्टिन क्रो यांच्या निधनाने संपूर्ण क्रिकेट जगताला आज धक्का बसला.  या निधनाचे सर्वाधिक दुःख मार्टिन क्रो यांचा मोठा भाऊ जेफ क्रोला होते. पण तरीही त्यांनी आज आपलं कर्तव्य पार पाडले. 

भारत वि. यूएई सामन्यात जेफ क्रो मॅच रेफ्री म्हणून काम पाहत आहेत. 

जेफ क्रो हे मार्टिन क्रो पेक्षा चार वर्षांनी मोठे आहेत. पण त्यांनी टेस्ट क्रिकेटमधील आपले करिअर मार्टिन पेक्षा एका आठवड्याने सुरू केले होते. 

या दोन्ही भावांनी न्यूझीलंडचे वन डे आणि टेस्ट साठी नेतृत्व केले आहे.  आपल्या भावासाठी दुःखी असलेल्या जेफ क्रो यांनी ही स्पर्धा अर्धवट सोडली नाही. त्यांनी आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.