सामन्यानंतर धोनीनं घेतली नाराज राहाणेची भेट पण...

'अजिंक्यला वाट पाहावी लागेल' अशी प्रतक्रिया काही दिवसांपूर्वी धोनीनं व्यक्त केली होती... पण, यामुळे नाराज झालेल्या अजिंक्य राहाणेची समजूत काढण्यासाठी धोनीनं मॅचनंतर त्याची भेट घेऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता, असं आता समोर येतंय.

Updated: Jun 25, 2015, 02:48 PM IST
सामन्यानंतर धोनीनं घेतली नाराज राहाणेची भेट पण... title=

मुंबई : 'अजिंक्यला वाट पाहावी लागेल' अशी प्रतक्रिया काही दिवसांपूर्वी धोनीनं व्यक्त केली होती... पण, यामुळे नाराज झालेल्या अजिंक्य राहाणेची समजूत काढण्यासाठी धोनीनं मॅचनंतर त्याची भेट घेऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता, असं आता समोर येतंय.

राहाणेला हटवून अंबाती रायडूला संधी देण्याचा निर्णय भारत - बांग्लादेश दरम्यान झालेल्या रविवारच्या मॅचमध्ये घेण्यात आला होता. अर्थात 'प्लेइंग इलेव्हन'मध्ये राहण्याची संधी अजिंक्यला गमवावी लागली होती.   
 


धोनी आणि अजिंक्य... सामन्यानंतर

अंबाती रायडू आणि अजिंक्य राहाणे या दोघांचाही फॉर्म पाहिला असता साहजिकच राहाणे रायडूहून सरस ठरतो. त्यामुळे, धोनीच्या या निर्णयावर वाद उभा राहिला होता. टेस्ट कॅप्टन विराट कोहलीदेखील धोनीच्या या निर्णयावर नाखुश असल्याचं समजतंय. त्यामुळे, अजिंक्य हाच विराट आणि धोनी यांच्यातील मतभेदाचं कारण ठरतोय का? असाही प्रश्न आता पडलाय.

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला 'टीम इंडियाचा ड्रेसिंग रुममधला वाद' तो याच विषयावरून होता का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडलाय. 

सामन्यानंतर कुणाच्याही नकळत अजिंक्यची भेट घेऊन धोनीनं त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, राहाणे मात्र बराच नाराज दिसला. तो तिथून निघून जातानाही धोनी त्याला काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. मात्र अजिंक्यनं मागे वळूनही पाहिलं नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.