जिंकल्यानंतरही पराभूत झाला कर्णधार धोनी!

 भारतीय टीमचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली काल टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजयश्री मिळविला पण टीम इंडियात आजकाल सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत नाही. याचे एक प्रत्यक्ष उदाहण मैदानात पाहायला मिळाले. भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य राहणे हे एकमेकांत मैदानाच भिडले आणि ताळमेळ नसल्याने कोहली रनआऊट झाला आणि त्याने पॅव्हेलिअनचा रस्ता पकडला. 

Updated: Oct 15, 2015, 11:50 AM IST
जिंकल्यानंतरही पराभूत झाला कर्णधार धोनी! title=

इंदूर :  भारतीय टीमचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली काल टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजयश्री मिळविला पण टीम इंडियात आजकाल सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत नाही. याचे एक प्रत्यक्ष उदाहण मैदानात पाहायला मिळाले. भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य राहणे हे एकमेकांत मैदानाच भिडले आणि ताळमेळ नसल्याने कोहली रनआऊट झाला आणि त्याने पॅव्हेलिअनचा रस्ता पकडला. 

रहाणेने नकार दिल्यानंतरही कोहली दुसऱ्या रनसाठी धावत सुटला, त्यामुळे तो रन आऊट झाला. राहणेवरून धोनी आणि कोहली यांच्यात पहिल्यापासूनच वाद सुरू आहे. कोहलीचे रन आउट होणे यात अनेक प्रश्न निर्माण होत आहे. पण टीममधील हा संघर्ष क्षमविण्यास धोनी कमी पडत आहे. 

शिस्तप्रिय टीम म्हणून ओळखली जाणारी टीम इंडियामध्ये सध्या बेशिस्त वातावरण सुरू आहे. टीममध्ये एकजुटीची कमतरता दिसते आहे. त्यामुळे टीम इंडियावर अनेक प्रश्न निर्माण होत आहे. धोनीची शिस्त संपली का?... टीम इंडियाचे सदस्य धोनीचे ऐकत नाही का? 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x