फोटोशॉप करणाऱ्यांना धोनीचं सणसणीत उत्तर

मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यात रविवारी झालेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्याआधी महेंद्रसिंग धोनीचे शीर तास्किन अहमदने स्वतःच्या हातांत पकडले आहे असा फोटोशॉप केलेला फोटो व्हायरल झाला होता. 

Updated: Mar 7, 2016, 03:36 PM IST
फोटोशॉप करणाऱ्यांना धोनीचं सणसणीत उत्तर title=

मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यात रविवारी झालेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्याआधी महेंद्रसिंग धोनीचे शीर तास्किन अहमदने स्वतःच्या हातांत पकडले आहे असा फोटोशॉप केलेला फोटो व्हायरल झाला होता. 

भारतीय क्रिकेट चाहत्यांचा या फोटोमुळे पारा चढला. या फोटोवर अनेक भारतीयांनी आपला आक्षेपही नोंदवला. पण, कॅप्टन कूल असणाऱ्या धोनीने मात्र 'कूल' राहून त्याच्या बांगलादेशी टीकाकारांना सणसणीत चपराक लगावली. शेवटच्या ओव्हरमध्ये दोन षटकार आणि एक चौकार मारत त्याने या सामन्यात भारताचा विजय निश्चित केला. 

पाहा कसे दिलं धोनीने उत्तर...

India vs Bangladesh

Posted by WYO - Wear Your Opinion on Sunday, March 6, 2016