धोनीने आतापर्यंत अशा शब्दात कुणाचंही कौतुक केलेलं नाही

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने मुंबईचा प्रतिभावंत खेळाडू अजिंक्य राहणेचं कौतुक केलं आहे, अजिंक्य राहणेने आपल्या खेळात मोठा सुधार केला आहे, त्यामुळे यापुढे टीममधील कोणतीही भूमिका पार पाडण्यास अजिंक्य राहणे सक्षम असल्याचं महेंद्र सिंह धोनीने म्हटलं आहे.यावरून धोनी राहणेवर नवी जबाबदारी सोपवू शकतो.

Updated: Feb 24, 2015, 12:12 AM IST
धोनीने आतापर्यंत अशा शब्दात कुणाचंही कौतुक केलेलं नाही title=

पर्थ : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने मुंबईचा प्रतिभावंत खेळाडू अजिंक्य राहणेचं कौतुक केलं आहे, अजिंक्य राहणेने आपल्या खेळात मोठा सुधार केला आहे, त्यामुळे यापुढे टीममधील कोणतीही भूमिका पार पाडण्यास अजिंक्य राहणे सक्षम असल्याचं महेंद्र सिंह धोनीने म्हटलं आहे.यावरून धोनी राहणेवर नवी जबाबदारी सोपवू शकतो.

कॅप्टन कूल म्हणतो, दक्षिण आफ्रिकेविरोधात शिखर धवन शिवाय अजिंक्य राहणेने देखिल तडाखेबाज फलंदाजी केली होती, ६० चेंडूत राहणेने ७९ धावा केल्या होत्या, वेलिंग्टन, लॉर्डस आणि मेलबर्न सारख्या टेस्ट शतकावरून लक्षात येतं की अजिंक्य कोणता दर्जा असलेला खेळाडू आहे.

अजिंक्य राहणे हा अधिक नम्र, आणि सतत खेळात सुधार करणारा खेळाडू आहे, २६ वर्षीय अजिंक्य राहणेचं कॅप्टन कूल धोनीने देखिल कौतुक केलं आहे.

क्षेत्ररक्षण, बॅटिंग, टायमिंग, खाली जागेत शॉट मारणे, दबावातही दडाखेबाज फलंदाजी करणे, चांगली भागेदारी पार पाडणे, रहाणे अंतमुर्खी आहे, सतत हसत असतो, त्याला काहीही सांगितलं तर तो काहीही न बोलता हो म्हणून काम फत्ते करण्यामागे लागतो, असं धोनीने म्हटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.