लंडन : राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांच्या नावावर असलेला एक विक्रम मोडीत निघाला आहे. रॉयल लंडन वनडे क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडच्या मिशेल लंब आणि रिकी वेसेल्स यांनी हा विक्रम मोडलाय.
नॉटिंघमशायर क्लबकडून खेळताना लंब आणि वेसेल्स यांनी नॉर्थम्प्टनशायरच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करत 39.2 ओव्हर्समध्ये 342 धावा केल्या.
वनडे सामन्यांत नोंदविलेली ही सर्वोत्तम खेळी आहे. यापूर्वी हा विक्रम द्रविड आणि गांगुली यांच्या नावावर 17 वर्षापूर्वी नोंदविला गेला होता. या दोघांनी 1999च्या वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात खेळताना 318 धावा केल्या होत्या.
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी सरे संघाने 2007 मध्ये ओव्हल मैदानावर 496 धावा केल्या होत्या.
लंब आणि वेसेल्स यांनी 342 धावा केल्या. या धावसंख्येत लंबचा वाटा 184 धावांचा, तर वेसेल्सचा 146 धावांचा होता.
लंबने 150 बॉलमध्य़े 21 चौकार आणि 6 षटकार खेचत 184 धावा केल्या. तर, वेसेल्सने 97 बॉलमध्य़ेच 14 चौकार आणि 8 षटकारांसह 146 धावा केल्या. या दोघांच्या खेळीमुळे नॉटिंघमशायर क्लबने 445 धावांचा डोंगर रचला.