राजकोट टेस्टमध्ये इंग्लंडचा धावांचा डोंगर

राजकोट टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडनं धावांचा डोंगर उभारला आहे.

Updated: Nov 10, 2016, 02:49 PM IST
राजकोट टेस्टमध्ये इंग्लंडचा धावांचा डोंगर  title=

राजकोट : राजकोट टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडनं धावांचा डोंगर उभारला आहे. इंग्लंडचा संघ 537 रनवर ऑल आऊट झाला आहे. इंग्लंडकडून जो रुट, मोईन अली आणि बेन स्टोक्सनं शानदार सेंच्युरी झळकवत इंग्लंडला मजबूत स्थितीमध्ये पोहोचवलं आहे.

भारताकडून रवींद्र जडेजानं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या तर शमी, यादव, अश्विनला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या. अमित मिश्राला एक विकेट घेण्यात यश आलं. इंग्लंडच्या पहिल्या इनिंगमधल्या या बलाढ्य आव्हानाचा सामना करण्यासाठी भारतीय बॅट्समनना कंबर कसावी लागणार हे मात्र नक्की.