पेनल्टी शूटआउटमध्ये ब्राझीलची चिलीवर ३-२ नं मात

डेंजरस चिलीकडून पराभूत होण्याची नामुष्की यजमान टीमवर ओढवली होती. मात्र, पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्राझिलनं 3-2 नं विजय मिळवत क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. ज्युलियो सेसार ब्राझिलियन टीमच्या विजयाचा हिरो ठरला.  चिली पराभूत झाल्यानं त्यांचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं.

AFP | Updated: Jun 29, 2014, 11:07 AM IST
पेनल्टी शूटआउटमध्ये ब्राझीलची चिलीवर ३-२ नं मात title=

बेलो होरीझाँटे: डेंजरस चिलीकडून पराभूत होण्याची नामुष्की यजमान टीमवर ओढवली होती. मात्र, पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्राझिलनं 3-2 नं विजय मिळवत क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. ज्युलियो सेसार ब्राझिलियन टीमच्या विजयाचा हिरो ठरला.  चिली पराभूत झाल्यानं त्यांचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं.

नॉक आऊट राऊंडच्या पहिल्याच मॅचमध्ये फुटबॉल चाहत्यांना सुपर एंटरटेनिंग मॅच पाहायला मिळाली. यजमान ब्राझिलियन टीमवर पराभवाचं सावट होतं. मात्र, पेनल्टी शूट आऊटमध्ये सांबा टीमनं बाजी मारत वर्ल्ड कपमधील आपलं आव्हान जिवंत ठेवलं. ब्राझिलियन गोलकीपर ज्युलियो सेसारमुळंच ब्राझिलियन टीमला हा विजय साकारता आला. पेनल्टी शूट आऊटमध्ये चिलीचे दोन प्रयत्न सेसारनं हाणून पाडले. त्यानंतर चिलीच्या गोन्झालो झाराचा बॉल गोलपोस्टला आदळला. आणि ब्राझिलियन टीमच्या फुटबॉलपटूंनी सुटकेचा निश्वास टाकला. या विजयानंतर ब्राझिलियन टीमच्या फुटबॉलपटूंना आपले अश्रू अनावर झाले.

स्टार फुटबॉलर नेमारपासून साऱ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं. 60 हजार फुटबॉल चाहत्यांसमोर ब्राझिलियन टीमनं रडत-खडत वर्ल्डकपमधील आपलं आव्हान कायम राखलं. तर चिलीच्या टीमनं जबरदस्त खेळ करूनही त्यांचं प्री-क्वार्टर फायनलमध्येच पॅकअप झालं. नेमारनं मॅचमध्ये गोल कऱण्याच्या अनेक संधी गमावल्या. तर हल्कनं गोल करूनही रेफ्रींनी तो गोल दिला नाही. रिप्लेतही हल्कचा गोल हँडगोल असल्याचं दिसून आलं होतं.

दरम्यान, ब्राझिलियन टीमनं 18 व्या मिनिटालाच मॅचमध्ये आघाडी घेतली होती. डेव्हिड लुईझनं आपला पहिला आंतरराष्ट्रीय गोल झळकावत यजमान टीमला दणक्यात सुरुवात करून दिली. मात्र, 32 व्या मिनिटीला चिलीच्या इनफॉर्म फुटबॉलर ऍलेक्सी सांचेझनं गोल करत चिलीला 1-1 नं बरोबरी साधून दिली. सेकंड हाफमध्ये दोन्ही टीम्सना गोल झळकावण्यात अपयश आलं. यानंतर एक्स्ट्रा टाईममध्येही दोन्ही टीम्स गोल करू शकल्या नाहीत. आणि अखेर ही मॅच पेनल्टी शूटआऊटमध्ये गेली आणि यामध्ये ब्राझिलियन टीमनं विजय मिळवत.

आपला पराभव टाळला. यजमानांनी कसाबसा चिलीवर विजय मिळवलाय. आता क्वार्टर फायनलमध्ये ब्राझिलियन टीमला चिलीविरुद्ध केलेल्या चुका सुधारत आपला खेळ उंचवावा लागणार आहे

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.