मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ४४ वा वाढदिवस

 सचिन तेंडुलकरच्या बॅटिंगचा २४ वर्ष क्रिकेटप्रेमींनी मनमुराद आनंद लुटला. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 24, 2017, 02:14 PM IST
 मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा  ४४ वा वाढदिवस title=

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज ४४ वाढदिवस,  सचिन तेंडुलकरच्या बॅटिंगचा २४ वर्ष क्रिकेटप्रेमींनी मनमुराद आनंद लुटला. सचिनवर त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

वन-डे आणि टेस्ट क्रिकेटनं सचिननं प्रतिस्पर्धी टीम्सना आपल्या बॅटचा चांगलाच तडाखा दिला. त्याची प्रत्येक इनिंग ही सचिनप्रेमींसाठी कायमच अविस्मरणीय ठरली. आतातर सचिनचा जीवनपट लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.

'सचिन अ बिलियन ड्रीम' या चित्रपटातून मास्टर-ब्लास्टरचा जीवनप्रवास त्याच्या चाहत्यांना पाहता येणार आहे. क्रिकेटच्या या अनभिषिक्त सम्राटाला 'झी 24 तास'च्याही शुभेच्छा.