बांगलादेश दौरा | टीम इंडियात 'भज्जी इज बॅक'

बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे, ऑफ स्पिनर हरभजन सिंहचं टेस्ट टीममध्ये कमबॅक झालं आहे, तर महेंद्र सिंह धोनी वनडे मालिकेत खेळणार आहे. युवराजचा मात्र टीम इंडियात यावेळी देखिल समावेश झालेला नाही.

Updated: May 20, 2015, 02:38 PM IST
बांगलादेश दौरा | टीम इंडियात 'भज्जी इज बॅक' title=

मुंबई : बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे, ऑफ स्पिनर हरभजन सिंहचं टेस्ट टीममध्ये कमबॅक झालं आहे, तर महेंद्र सिंह धोनी वनडे मालिकेत खेळणार आहे. युवराजचा मात्र टीम इंडियात यावेळी देखिल समावेश झालेला नाही.

कसोटी सामन्याचा कॅप्टन विराट कोहली असणार आहे, १० जून रोजी बांगलादेशात पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे.

वनडे टीमसाठी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी असेल, विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैनाचा टीममध्ये समावेश करण्याक आला आहे, शिवाय वनडे टीममध्ये शिखर धवन, अजिंक्य राहणे, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहित शर्मा, धवल कुलकर्णीचाही समावेश आहे.

बांगलादेश दौऱ्यात टीम इंडिया बांगलादेश सोबत तीन वडे सामने खेळणार आहे, या वेळी सर्वात मोठा बदल म्हणजे ऑफ स्पिनर हरभजन सिंहची टेस्ट टीममध्ये पुनरागमन झालं आहे. टेस्ट टीमचा कॅप्टन विराट असेल, विराट कोहली शिवाय, मुरली विजय, शिखर धवन, पुजारा, उमेश यादव, ईशांत शर्मा, ऐरोन, भुवनेश्वर कुमार, शाहा, रविचंद्रन अश्विन, हरभजन सिंह आणि करण शर्माचा समावेश आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.