रितिकाने भर स्टेडिअममध्ये केले रोहितला प्रेमाचे इशारे!

मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये खेळला गेलेला आयपीएल-८चा चेन्नईविरुद्धचा पहिला क्वालीफायर सामना मुंबई इंडियन्सने २५ रन्सने जिंकला. या सामन्यादरम्यान मुंबईच्या कर्णधार रोहित शर्माची गर्लफ्रेंड रितिका साजदेह ही देखील मैदानात उपस्थित होती. 

Updated: May 20, 2015, 02:05 PM IST
रितिकाने भर स्टेडिअममध्ये केले रोहितला प्रेमाचे इशारे! title=

मुंबई: मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये खेळला गेलेला आयपीएल-८चा चेन्नईविरुद्धचा पहिला क्वालीफायर सामना मुंबई इंडियन्सने २५ रन्सने जिंकला. या सामन्यादरम्यान मुंबईच्या कर्णधार रोहित शर्माची गर्लफ्रेंड रितिका साजदेह ही देखील मैदानात उपस्थित होती. 

मुंबई इंडियन्सच्या उत्कृष्ट कामगिरिने रोहित खूश होता. त्यादरम्यान रितिका आपल्या दोन्ही हाताने रोहीतला प्रेमाचे इशारे करतांना दिसली. रोहीत आणि रितिकाचा गेल्या महिन्यातच साखरपुडा झाला आहे. त्यामुळे टीमच्या कामगिरीचा आनंद आणि रितिकाला पाहून, रोहितचा आनंद द्विगुणीत झाला. 

चेन्नईला पराभूत करून मुंबई थेट आयपीएलच्या फायनलमध्ये पोहचली आहे. आता फायनलमध्ये मुंबईविरुद्ध कोणती टीम खेळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.