शंभराव्या टेस्टमध्ये हशीम आमलाची सेंच्युरी

शंभराव्या टेस्टमध्ये सेंच्युरी झळकवणाऱ्या दिग्गज खेळाडूंच्या यादीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हशीम आमलाचा समावेश झाला आहे.

Updated: Jan 12, 2017, 10:59 PM IST
शंभराव्या टेस्टमध्ये हशीम आमलाची सेंच्युरी  title=

जोहान्सबर्ग : शंभराव्या टेस्टमध्ये सेंच्युरी झळकवणाऱ्या दिग्गज खेळाडूंच्या यादीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हशीम आमलाचा समावेश झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये अमलानं सेंच्युरी झळकावली आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा अमला 125 रनवर नाबाद आहे. दिवसाअखेरीस दक्षिण आफ्रिकेनं 338 रनवर 3 विकेट गमावल्या आहेत. आमलानं ड्यूमनीबरोबर 292 रनची पार्टनरशीप केली, यामध्ये ड्यूमनीच्या 155 रनचा समावेश आहे.

हशीम आमलाबरोबरच ग्रॅम स्मिथ, रिकी पॉटिंग, इंझमाम उल हक, अॅलेक स्टुअर्ट, गॉर्डन ग्रिनीज, जावेद मियांदाद आणि कॉलिन काऊड्री या दिग्गज खेळाडूंनीही त्यांच्या शंभराव्या टेस्टमध्ये सेंच्युरी मारली होती. रिकी पॉटिंगनं तर शंभराव्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये सेंच्युरी झळकवण्याचा विश्वविक्रम केला होता.